Dyanganag

Dnyanganga Library &
Study Center
ज्ञानगंगा ग्रंथालय व अभ्यासिका


" वाचाल तर वाचाल!!! "                    " तुम्ही वाचा म्हणजे तुमची मुलेही वाचतील !!! "                    " पुस्तक ही माणसाची चौथी मुलभूत गरज आहे !!! "                     " Don’t Buy, Rent It!!! "                   

About Us

ज्ञानगंगा ग्रंथालय व अभ्यासिका

चंदननगर - खराडी, विमाननगर हा परिसर गेल्या काही वर्षात खूप वेगाने विकसित झाला आहे. नव्याने सुरु झालेले वर्ल्ड ट्रेड सेंटर तसेच इओन आय. टी. पार्क मुळे बऱ्याच आय. टी. कंपन्या खराडी परिसरात सुरु झाल्या. रोजगार वाढल्यामुळे येथील लोकसंख्या गेल्या काही वर्षात भरपूर वाढली. नगर रोड, खराडी – चंदननगर या परिसरात भरपूर सुधारणा झाली. परंतु येथे एकही ग्रंथालय नव्हते.

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत, तर पुस्तक हि माणसाची चौथी मुलभूत गरज आहे. लहानपणा पासूनच शाळेच्या ग्रंथालयात मला कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे. ऐतिहासिक अशी विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. नव्या पिढीलाही चांगल्या प्रतीचे साहित्य वाचायला मिळावे व वाचन संस्कृती घराघरात पोहोचावी या उद्देशाने मी दिनांक १० डिसेंबर २००९ रोजी ज्ञानगंगा ग्रंथालयाची स्थापना केली.

ग्रंथालय चालू झाले त्या दिवशी आपल्या संग्रहात फक्त ३६४ पुस्तके होती. आणि आज ग्रंथालयात ५००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे. दर महिन्याला आपण नविन पुस्तकांची खरेदी करतो. ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेतील दर्जेदार पुस्तके व मासिके उपलब्ध आहेत. तसेच मराठी मध्ये कथासंग्रह, कादंबरी, ऐतिहासिक, पौराणिक, अनुवादित, चरित्र – आत्मचरित्र, कविता संग्रह, प्रवास वर्णन, भयकथा, पाक कृती, बाल साहित्य, इ. व इतरही अनेक प्रकारची पुस्तके आहेत.

वर्तमानपत्रांमध्ये आपण बऱ्याचदा वाचतो कि वाचन संस्कृती लोप पावतेय. परंतु माझा अनुभव जरा वेगळा आहे. ज्ञानगंगा ग्रंथालयात अगदी ३-४ वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील वाचक आहेत. त्यातही तरुण वाचक वर्ग जास्त आहे. आजच्या व्हाट्स अॅप आणि फेसबुकच्या जगातही वाचक भरपूर आहेत. फक्त लोकांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत.

वाचकांना हवे ते पुस्तक उपलब्ध करून द्यायचा माझा नेहमी प्रयत्न असतो. ग्रंथालयात जितकी दर्जेदार पुस्तके आहेत तितक्याच ताकतीचे वाचकही आहेत. वाचकांनी ग्रंथालयाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मी यशस्वीरीत्या ग्रंथालय चालवू शकलो. वाचन संस्कृती घराघरात पोहोचविण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न चालू आहे. त्यात माझ्या बरोबरच सर्व वाचकांचाही सहभाग आहे. त्याबद्दल मी सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

-गणेश दारवटकर
संचालक
९८२३३४२२७८ / ८२३७४०८०८०

Testimonials